श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माणासाठी अनपेक्षित निधी प्राप्ती

0
483

नाशिक, दि.18 (पीसीबी) : भद्रकाली मंदिरात राम जन्मभूमी निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन होते , तसा साधा आणि आटोपशीर कार्यक्रम , हे मंदिर गावात आहे, थोड्या पायऱ्या चढून जावे लागते , तिथे एक कार्यालय असावे असा कार्यकर्त्यांचा मानस होता.

खूप गर्दी वगैरे या मंदिरात नसते , सण, उत्सव , महोत्सवाला गर्दी असते

कार्यक्रम आटोपशीर झाला , सगळे कार्यकर्ते तिथली आवरा-आवर करत होते , तिथे एक ७५-८० वर्षाच्या आजी आल्या व म्हणाल्या की, “तुम्ही राम मंदिरासाठी वर्गणी जमा करत आहात ना ?”
“हो आजी”
“तुमच्या पैकी आरएसएस चे कोण आहेत?”
मग जे काय २-५ कार्यकर्ते ती आवरा सावर करत होते, त्यांनी सगळ्यांनी कान टवकारले , आजी आम्ही सगळेच संघाचे कार्यकर्ते आहोत , त्या ८० वर्षाच्या आजींनी त्या त्यांच्या नातवाच्या , पांतवाच्या वयाच्या कार्यकर्त्यांना वाकून नमस्कार केला , सगळे जण खाली वाकून
“आजी हे काय ?”
त्यांना आम्ही सगळे नानी शुक्ल म्हणून ओळखतो , तसे त्यांचे नाव श्रीमती शैलजा मार्तंड शुक्ल आहे!

“अरे मुलांनो, माझे वडील संघात जात होते. डॉक्टर , गुरुजी आमच्या घरी येत होते , माझे सासर पण संघाचे!
श्रीगुरुजी तर नेहमी येत असत. हा नमस्कार त्यांना आहे मुलांनो!”

“तुम्ही हे निधी गोळा करता तर मला पण मंदिरा साठी काही द्यायचे आहे. मला माझ्या नवऱ्याची अर्थी पेन्शन मिळते ती १६०००/- रू. आहे , मी एक महिन्याची पेन्शन मंदिराला देऊ शकते”
“ठीक आहे आजी, तुम्ही कुठे राहता , तुमचे नाव काय ?” अशी चर्चा झाली , मग त्या आजी म्हणाल्या की, “मी दोन महिन्याची पेन्शन देऊ शकते ते ३२०००/- आहेत.”
“ठीक आहे, आजी. पण तुमच्याकडे चेक आहे का? आम्ही २००००/- च्या वर जी रक्कम आहे ते चेकने घेणार आहोत , आम्ही तुमच्या घरी येतो” “चला रे पोरांनो..”

त्या आजींनी घरी नेले सगळ्यांना चहा पाजला , त्या एकट्याच राहत होत्या , घर साधारण होते , जुना वाडा तो , दोन मुली आहेत त्या आजींना! त्यांची लग्न झाले , ह्या आजी एकट्याच वाड्यात राहत आहेत

परत जरा गप्पा झाल्या. आजींनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. त्यांनी त्यांची बँकेची पिशवी काढली आम्हाला वाटले की आजी चेक बुक काढतील ,चेक भरून चेक वर सही करतील. त्यात त्यांना एक FD सापडली त्यांनी ती वाचली आणि चेक बुक एकाच्या समोर केले आणि म्हणाल्या की, “लिही, ह्या वर नाव आणि रक्कम *दोन लाख टाक”* आम्ही सगळे एकमेकांकडे बघत राहिलो!!
हा आहे श्रीरामनामाचा महिमा!
आणि हि आहे संघाची पुण्याई!!