श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महोत्सवात 376 जणांची मोफत नेत्र तपासणी

0
232

पिंपरी, दि. 4 (पीसीबी) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात कोरोना कालावधीत देखील खंड न पाडता दरवर्षीप्रमाणे मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप आरोग्य शिबिर घेण्यात आले.  376 जणांची तपासणी करण्यात आली. तर, आर्थिक दुर्बल घटकातील  217 लोकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.

कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान रद्द केले होते. मात्र, रक्तदान, नेत्रतपासणी शिबिरात खंड पडू दिला नाही. यंदाही दोनही शिबिर घेण्यात आले.

संजीवन समाधी महोत्सवात अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे यांच्या माध्यमातून दरवर्षी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येते. 2004 पासून अखंडपणे हे शिबिर सुरु आहे. यंदा कोरोना कालावधीत देखील शिबिर पार पडले. यामध्ये 376 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर, आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील  217 जणांना चष्म्याचे वाटप केले.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज ,देवस्थानचे ट्रस्टी विश्राम देव, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे उपस्थित होते. तर, खासदार श्रीरंग बारणे यांनीही शिबिराला भेट दिली.