Bhosari

श्रीक्षेत्र अरण येथे माळी समाजाचा १ ऑगस्ट रोजी भव्य मेळावा

By PCB Author

July 27, 2019

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – श्रीक्षेत्र अरण विकासासाठी आणि माळी समाजाच्या हित आणि अस्मितेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माळी समाजाचा भव्य मेळावा १ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता श्रीक्षेत्र अरण (ता.माढा.जि.सोलापूर) येथे आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांच्या संयोजनाखाली पार पडणार आहे.

पिंपरी चिंचवड शहर सावता परिषद युवक आघाडीचे संपर्क प्रमुख चेतन वाघमारे, शहर संघटक प्रमुख सोमनाथ वाघमारे, भोसरी संघटक प्रमुख श्रीयश मोहळकर, चिंचवड विभाग प्रमुख ज्ञानेश्वर वाघमारे, बाणेर विभाग प्रमुख सूरज भुजबळ या मेळाव्याचे निमंत्रक आहेत.

तरी या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.