Maharashtra

शौचालयाचा दरवाजा ठोठावल्याच्या रागातून एकाचा खून

By PCB Author

September 30, 2018

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  शौचालयाचा दरवाजा ठोठावल्याच्या रागातून एकाचा खून झाल्याची घटना  प्रकार समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास अंधेरीतील साकीनाका भागात घडली.

गणेश किर्लोस्कर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपी प्रविण गावडे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपी प्रविण गावडे हा अंधेरी साकीनाका भागातील सार्वजनिक शौचालयात गेला होता. दरम्यान एका मुलाने बाहेरून शौचालयाचा दरवाजा ठोठावला. रागात बाहेर आलेल्या प्रविणने मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलाचे काका गणेश किर्लोस्कर त्याठिकाणी आले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रविणने गणेश यांनाही धक्काबुक्की करत जबर मारहाण केली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी प्रविण गावडेविरोधा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.