Pune

शोरूमचे शटर तोडून आत प्रवेश केला; ‘एवढ्या’ लाखांचा मुद्देमाल चोरीला

By PCB Author

June 19, 2021

वानवडी, दि. 19 (पीसीबी) : वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लुल्ला नगर येथील ऑरेंज मोटाररॉड केटीएम ड्युक या दुचाकीच्या शोरूमचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी तब्बल चार लाख 93 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. 18 तारखेच्या मध्यरात्री ही घटना घडली. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिराग सुधीर मुथा (वय 28) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लुल्ला नगर परिसरात फिर्यादी यांचे के टी एम ड्यूक या दुचाकीचे शोरूम आहे. 18 तारखेच्या मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी शोरूमचे लोखंडी शटर आणि काचेच्या दरवाजाचे सेंटर लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्यांनी रोख दोन लाख रुपये चार हेल्मेट आणि विक्रीसाठी ठेवलेली एक दुचाकी असा एकूण 4 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. वानवडी पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.