शैक्षणिक कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणीची 90 हजारांची फसवणूक

0
218

देहूरोड, दि. ५ (पीसीबी) – शैक्षणिक कर्ज देण्याच्या आमिषाने दोघांनी एका तरुणीची 90 हजारांची फसवणूक केली. ही घटना 1 एप्रिल रात्री नऊ ते दोन एप्रिल दुपारी सव्वा एक वाजताच्या कालावधीत देहूरोड येथे घडली.

मोणीसा आयुब खान (वय 20, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजीत ठाकूर, जगदीश कुमार नडीयाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना शिक्षणासाठी कर्ज हवे होते. त्यासाठी त्या ऑनलाईन माध्यमातून शोध घेत होत्या. त्यावेळी एका वेबसाईटवरील क्रमांकावरून फिर्यादी यांना फोन आला. संजीत ठाकूर आणि जगदीश कुमार नडीयाल या दोघांनी फिर्यादी यांना पाच लाख रुपयांचे शैषणिक कर्ज देण्याचे आमिष दाखवले. कर्जाची प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी चार्जेस, टॅक्सेशन चार्जेस, कंपनीचे सिक्युरिटी चार्ज, आरबीआयचे पाच टक्के व्याज अशा कारणाने फिर्यादी यांच्याकडून 90 हजार 350 रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपींनी फिर्यादी यांना कर्ज मंजूर करून दिले नाही. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.