Maharashtra

शेलारांची घोषणाबाजी, ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’, भाजप आमदार म्हणाले…

By PCB Author

December 18, 2019

नागपूर, दि.१८ (पीसीबी) –नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भाजप आमदारांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’ असा नारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला, त्यानंतर ‘२५ हजाराला नाही म्हणतो’ असं म्हणत भाजप आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका  केली.सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी घोषणाबाजी केली.

हेक्टरी २५ हजारांची मदत शेतकऱ्यांना झालीच पाहिजे. दिलेला शब्द पाळा, अशा मागण्या भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केल्या. त्यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवसही रंगणार आहे.