Maharashtra

शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यापारी, उद्योजक, यांची निराशा करणारा अर्थसंकल्प – अशोक चव्हाण

By PCB Author

July 05, 2019

मुंबई, दि, ५ (पीसीबी) – मोदी सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प २०१९ वर माजी खासदार अशोक चव्हाण यांनी टीका केली.

मध्यमवर्गीयांना केंद्रबिंदू मानून देशाची आर्थिक धोरणे तयार केली जातील असे भाजपने दिलेले आश्वासन यंदाच्या अर्थसंकल्पात पाळलेले दिसत नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर सदर केलेला हा अर्थसंकल्प धनिकधार्जिणा व शेतकरी, मध्यमवर्गीय, गरीब, बेरोजगार, व्यापारी, उद्योजक, ग्रामीण क्षेत्राची घोर निराशा करणारा आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.