शेतकरी कायदे मागे घेण्यासाठी गुरुवारी काँग्रेसची व्हर्चुअल रॅली

0
198

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – भाजपने गेल्या संसदिय अधिवेशनात शेतीविषयक तीन कायदे घाईघाईत मंजूर केले. काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याला विरोध आहे. हे काळे कायदे म्हणूनच आम्ही त्यांचा उल्लेख करतो आहे. त्याला विरोध आहे, ते मागे घेतले पाहिजेत. त्यासाठी यापूर्वी तालुका, गावांत अंदोलने केली आहेत. आता १५ ऑक्टोबर (गुरुवार) रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्रात एक अभूतपूर्व अशी व्हर्च्युअल रॅला होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसुलमंत्री महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, या रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होतील. कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, खांन्देशातूनही ऑनलाईन द्वारे शेतकरी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या ठिकाणाहून ही रॅली लाईव्ह असेल. अभूतपूर्व अशा रॅलीतून आम्ही केंद्र सरकारला विरोध दर्शविणार आहेत. राज्यातील विविध १०,००० गावांध्ये एकाचवेळी शेतकरी सहभागी होणार आहेत. शेतकरी बचाव रॅली असे या रॅलीचे नामकरण केले आहे. सरकारचे अन्यायकारक जे कायदे ते मागे घेतले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.