शेतकरी कर्जमाफी केली नाही तर हे सरकार ५ वर्षे टिकणार नाही – रघुनाथ पाटील

0
534

मुंबई,दि. ४(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल बैठक घेतली. अशातच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी यांनी एक भाकीत वर्तवलंय. राज्यासाठी लवकरच महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. यासाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार ५ वर्ष टिकणार नाही, असं भाकित पाटील यांनी वर्तवलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत आश्वासन दिलं होतं. आता त्यांना सत्तेत बसण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. शेतकरी संघटना १२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करा अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करावं लागेल, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला.