शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वडगाव मावळ मध्ये एकदिवसीय उपोषण

0
614

मावळ,दि.१५(पीसीबी) – दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वडगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने एकदिवसीय उपोषण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या काळ्या कायद्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी वडगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे व उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळी भेटी दिल्या.

तसेच सामाजिक संस्था, पत्रकार बांधव, महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, वडगाव मावळ लीगल प्रॅक्टीशन्स बार असोसिएशन, देहू नागरिक मंच, पुणे जिल्हा राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल, व्यापारी बांधव, कामगार वर्ग, महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून जाहीर पाठिंबा दिला.