Maharashtra

शेकाप आमदार जयंत पाटलांनी लोकसत्ताच्या पत्रकाराच्या कानशिलात लगावली

By PCB Author

May 23, 2019

रायगड, दि. २३ (पीसीबी) – शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांच्या कानशिलात लगावली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रेसरुमध्ये आज (गुरूवार) हा प्रकार घडला आहे. या प्रकारावर पत्रकारांनी संताप व्यक्त करून पाटील यांच्या कृत्याचा निषेध केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये लोकसत्तामध्ये हर्षद कशाळकर यांनी ज्या काही बातम्या लिहिल्या होत्या, त्यातील काही बातम्यांचा राग मनात ठेऊन पाटील यांनी कशाळकर यांच्या कानाखाली लावल्याचे सांगितले जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रेसरुमध्ये झालेल्या  या  प्रकारावर पत्रकारांनी निषेध केला आहे.    निवडणूक केंद्रातच पत्रकाराला मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा   निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.