Pune

शुल्क नियमन समितीच्या सदस्यपदी शिरीष फडतरे

By PCB Author

June 20, 2021

पुणे, दि. १९ (पीसीबी) – शुल्क आकारण्याच्या शैक्षणिक संस्थांच्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी शिक्षण विभागाने शैक्षणिक शुल्क नियमन अधिनियम समिती स्थापन केली आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख, पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष शिरीष फडतरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

या निवडीबाबत शिरीष फडतरे म्हणाले, महाराष्ट्र राज्यासाठी शुल्क नियमन समितीचे सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे याचा मला आनंद वाटतो. हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश, कुलगुरू उच्च शिक्षण संचालक, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, शिक्षणतज्ज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यीय समिती आहे. राज्य सरकारसाठी काम करण्याची संधी आहे. या समितीच्या माध्यमातून शिक्षण संस्था वाजवी शुल्क आकारत आहेत की नाही हे तपासता येणार आहे. त्यामुळे म्हणाले, महाराष्ट्र राज्यासाठी शुल्क नक्कीच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.