Desh

शीख विरोधी दंगलीप्रकरणी एकाला फाशी, तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

By PCB Author

November 20, 2018

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – शीख विरोधी दंगली प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने एकाला फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा  आज (मंगळवार) सुनावली . याप्रकरणी दोषी ठरवत नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.   या प्रकरणाचा सुमारे ३४ वर्षांनंतर निकाल लागला आहे.

विशेष तपास पथकाने (एसआयटी) मागील आठवड्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांच्यासमोर दोषींचा गुन्हा गंभीर आहे. दोषींनी कट रचून हे कृत्य केल्याचे सांगितले होते. तसेच याप्रकरणी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

तर पीडित कुटुंबीयांकडून वरिष्ठ वकील एच एस फुल्का यांनीही एसआयटीच्या मागणीचे समर्थन केले होते. दरम्यान या प्रकरणी हरदेव सिंगचा भाऊ संतोख सिंगने तक्रार दाखल केली होती.  दिल्ली पोलिसांनी पुराव्याअभावी १९९४ मध्ये हे प्रकरण बंद केले होते. मात्र, दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करुन हे प्रकरण पुन्हा उघड करण्यात आले होते.