शीख दंगल; एका आरोपीला जन्मठेप, तर एका आरोपीला मुख्यमंत्रिपदाची शपथ – अरूण जेटली    

0
545

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – शीख दंगलप्रकरणी शीख समाज काँग्रेसच्या ज्या दुसऱ्या एका नेत्याला दोषी मानत आहे. त्या नेत्याला काँग्रेस आज (सोमवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ देत आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे.  आज दिल्लीच्या उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आलेले सज्जन कुमार हे १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीचे प्रतिक आहेत. या प्रकरणात आता शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात आहे, असे जेटली म्हणाले.