Notifications

शीखदंगली प्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा

By PCB Author

December 17, 2018

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – दिल्ली उच्च न्यायालयाने १९८४ मधील शीखदंगली प्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या  सज्जन कुमारला कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. याविरोधात दिल्ली न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज (सोमवारी) न्यायालयाने निकाल देताना सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.