Desh

शिव्या खायची कामे केली, तर शिव्या पडणारच; मायावतींचा मोदींवर निशाणा  

By PCB Author

May 13, 2019

गोरखपूर, दि. १३ (पीसीबी) – शिव्या  खायची कामे केली, तर शिव्या पडणारच,  असा निशाणा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर साधला. जेव्हा कोणी शिव्या खाण्यासारखी कामे करते तेव्हाच त्याला शिव्या दिल्या जातात . श्री मोदी यांनी ही गोष्ट लक्षात ठेऊन वाटचाल केली पाहिजे, असेही  मायावती म्हणाल्या. 

गोरखपूरमधील  प्रचारसभेत  बोलताना मायावती यांनी मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदी यांनी प्रचारसभांमध्ये बोलताना म्हटले आहे  की, विरोधक मला रोज नव्या शिव्या देत आहेत. यावर मायावती यांनी हे स्वाभाविकच आहे, असे सांगून पलटवार केला आहे.

दरम्यान, याआधी अलवर सामुहिक बलात्कार प्रकरणी राजकारण केले जात असल्याचा आरोप करताना मायावती यांनी मोदी यांच्यावर वैयक्तिक आरोप केले. आपल्या पत्नीला राजकारणासाठी ज्यांनी सोडले ते इतर महिलांचा सन्मान कसा करणार? अशा शब्दांत त्यांनी मोदींवर हल्ला केला आहे.  इतकेच नव्हे भाजप  नेते मोदींकडे जातात, तेव्हा त्यांच्या बायका घाबरतात, अशी टीकाही  केली.