Banner News

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये

By PCB Author

September 22, 2021

– खासदार श्रीरंग बारणे यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचा जोरदार धक्का – शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपाच्या संपर्कात

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – भाजपाचे २२ नगरसवेक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या सुरू असतानाच आता दुसऱ्या बाजुला भाजपाने शिवेसनेला अक्षरशः खिंडार पाडले आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे खंदे समर्थक, नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पती आणि जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी आज संघटनेला जयमहाराष्ट्र केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. शहर शिवसेनेत या घडामोडीमुळे मोठी खळबळ आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार बारणे यांना जोरदार धक्का दिल्याचे मानले जाते.

गजानन चिंचवडे यांच्या भाजपा प्रवेशाला विशेष महत्व आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच चिंचवडगाव परिसरात शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्यात गजानन चिंचवडे यांचे मोठे योगदान आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील २०१४ आणि २०१९ च्या निवडणूक प्रचाराची सर्व सूत्र चिंचवडे यांच्याकडे होती. चिंचवड विभानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर होते. भाजपा बहुल चिंचवडगाव परिसरातून केवळ आपल्या वैयक्तीक संपर्क आणि कार्यावर चिंचवडे यांनी शिवेसनेचा प्रभाव कायम ठेवला होता. त्यांच्या भाजपा प्रवेशाने शि वेसनेला आणि वैयक्तीक खासदार बारणे यांनाही मोठा फटका बसला आहे.

मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी कमळ हाती घेतले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते. कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी अत्यंत सुचक विधान केले असून आणखी पाच शिवेसनेचे नगरसवेक संपर्कात असल्याचे सांगून मोठा भूकंप केला आहे.

पिंपरी-चिंचवडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. – आ. लक्ष्मण जगताप उपस्थित होते