शिवानी सुर्वेची बिग बॉसच्या घरातून हाकलपट्टी

0
645

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले नाव म्हणजे शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरातील तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे तर कधी वादामुळे शिवानी नेहमीच चर्चेत राहिली. मात्र नुकतीच तिची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खरंतर शिवानीने गेल्या आठवड्यात घरातून बाहेर पडण्यासाठी तमाशा केला होता. त्याच कारणामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढले आहे.

बिग बॉसच्या घरात सतत होणारी भांडणे, त्यामुळे अनावर होणारा राग या सगळ्याचा परिणाम माझ्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होतोय. त्यामुळे मला घरातून बाहेर काढा अशी विनंती शिवानी वारंवार करत होती. इतकेच नव्हे तर बिग बॉसने माझे ऐकले नाही तर मी कायदेशीर कारवाई करेन अशी थेट धमकीच तिने बिग बॉसला दिली होती.