शिवाजी विद्यापीठाचं नाव बदला; छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

0
709

मुंबई,दि.४(पीसीबी) – कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ठेवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार आवश्यक असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच नावांमधील एकेरी उल्लेख टाळण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.