शिवाजीराव आढळराव पाटलांवरच उलटला कुरघोडीचा डाव; भोसरीचे राजकारण वेगळे वळण घेणार?

0
752

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली. मात्र भोसरी विधानसभा मतदारसंघात राजकारण करताना आढळराव पाटील यांचे राजकीय गणित चुकले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना अंगावर घेण्याचा कुरघओडीचा राजकीय डाव आता आढळराव पाटील यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. कारण भोसरीतील भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आम्ही आढळराव पाटील यांचे काम का करायचे?, असा सवाल करत निवडणुकीत काय चित्र निर्माण होईल याची झलक दाखवली आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यासमोर लांडगे यांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय राहिला नसून, पुढील काळात भोसरीचे राजकारण कोणते वळण घेते?, यावरच शिरूरचा निकाल ठरणार आहे.