Pune

शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून केला तरुणीवर बलात्कार

By PCB Author

August 06, 2018

पुणे, दि. ६ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलने २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान पुणे सातारा रोड येथे असलेल्या अश्र्विनी लॉजवर पिडीत तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती.

याप्रकरणी पिडीत २२ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा जयराम फुले (वय २४) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा आणि पिडीत २२ वर्षीय तरुणीने हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ कृष्णाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पुणे-सातारा रोड येथील अश्र्विनी लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने कृष्णाकडे लग्नाची विचारणा केली असता कृष्णाने पिडीत तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावर तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कृष्णा विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कृष्णाला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्हि.ए. भोसले तपास करत आहेत.