शिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न

0
805

पुणे, दि. १४ (पीसीबी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजीत  आविष्कार २०१८ स्पर्धेची   जिल्हास्तरीय फेरी शिवाजीनगर येथील एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी (दि. १४) संपन्न झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे  प्रभारी आधिष्ठाता डॉ. ए. डी. शाळीग्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता व सिद्धता कक्षाचे डेप्युटी रजिस्टार एम.  व्ही. रासवे, डॉ. मनीष वर्मा, डॉ. आर. एस. तलवारे, एआयएसएसएमएस संस्थेचे  सहसिचव सुरेश शिंदे, प्राचार्य  डॉ.  डी. एस. बोरमाणे, प्राचार्य डॉ. पी. बी. माने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला अधिक चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइ वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात आली. त्यातून निवडलेल्या ११०० प्रकल्पांचे सादरीकरण व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्पांची एकत्रित माहिती वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्याचा वापर वर्षभर विद्यार्थ्यांना करता येईल, असे अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षच्या समन्वयक डॉ. मनीष वर्मा यांनी सांगितले.

डॉ. ए. डी. शाळीग्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध अभियांत्रिकी शाखांचे एकीकरण व यांचे योगदान त्यांनी स्पष्ट केले. या योगदानातून नव संशोधकांची सुरुवात करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, असे त्यांनी सांगितले. या संशोधकांमधून उदयोजक तयार करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

एआयएसएसएमएम संस्थेचे सहसचिव सुरेश शिंदे यांनी या संशोधनाचा उपयोग  सामान्य  माणसाचे  प्रश्न सोडविण्यासाठी  करावे, असे सांगितले. या स्पर्धेत सुमारे ३०० प्रकल्प निवडण्यात आले होते. या प्रकल्पांमधून निवडलेल्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिन्यात पुढील फेरी होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली नवले यांनी केले. डॉ. डी. जी. भालके यांनी आभार मानले.