शिवाजीनगरमधील आयएसएसएमएस आयओआयटीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0
591

पुणे, दि. १६ (पीसीबी) – शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आयईटीई यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे यांनी महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा पत्र व गुलाबपुष्प पाठवून शुभेच्छा दिल्या.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांसाठी रस्सी खच, कॅरम, रांगोळी आणि टेबल टेनिस या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयईटीई पुणे विभागाचे अध्यक्ष किशोर शेंडे, मॅन्टॉर एस. के .खेडकर, माजी अध्यक्ष जी. के. डावरा, खजिनदार अतुल जोशी आदी उपस्थित होते.

या सर्वांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पीसीओएसबद्दल महिला आरोग्य जागरुकता ह्या विषयावर डॉ. लीना तथे यांनी मार्गदर्शन केले. तसेच योगतज्ज्ञ प्रेरणा भुस्कुटे यांनी “योगाचे जीवनातील महत्व” याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक आणि चषर देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी सर्वाना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या आयइटीई सम्वयक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. मोहिनी सारडे आणि क्रीडा विभाग प्रमुख दीपाली मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता फिलिप यांनी केले.