शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीड बोट अरबी समुद्रात बुडाली

0
727

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – मुंबईजवळील अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीड बोट खडकावर आपटून बुडाली. या बोटीवर २५ जण असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

गिरगांव चौपाटीजवळ शिवस्मारकाच्या पायाभरणीचा आज (बुधवार) कार्यक्रम होणार होता.  त्यासाठी समुद्रात २५ जणांना घेऊन जाणारी स्पीड बोट खडकावर जाऊन आदळली. त्यानंतर बोट समुद्रात बुडाली. या बोटीमध्ये प्रधान सचिव, पदाधिकारी, अधिकारी होते. पाण्यात पडल्यानंतर त्यांना तत्काळ सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर बचावासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. तर दोन बोटीच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत.