शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार होते पण स्वत:च मुख्यमंत्रिपदी बसले – तरुण भारत

0
390

मुंबई,दि.२८(पीसीबी) – आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘नागपूर तरुण भारत’मधून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार होते पण स्वत:च मुख्यमंत्रिपदी बसले, असं म्हणत टीका करण्यात आली आहे.

मी शिवसेनाप्रमुखांना आश्वस्त केले होते की, एक दिवस या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच बसवीन, शिवसैनिक आता पालखीचे भोई बनणार नाहीत, तर शिवसैनिक पालखीत बसेल. असे सांगणारे उद्धव ठाकरे स्वत:च पालखीत बसायला निघाले आहेत, असं म्हणत तरुण भारतमधून टीका करण्यात आली आहे.

यांचे ओझे सत्तेची पालखी वाहणार्‍या भोयांना पेलवेल की नाही, हे येणार्‍या काळात दिसेलच.शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायला हवे होते, असं तरुण भारतमध्ये म्हणण्यात आलं आहे.