शिवसेनेत प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही – आमदार अनंत गाडगीळ

0
696

पुणे, दि. २४ (पीसीबी) – मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती,  असे स्पष्ट करून काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांनी शिवसेना प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले.

मी काँग्रेसमध्येच कायम राहणार आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याचा  कोणताही  विचार  नाही. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी  उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती,  असा खुलासा करून  आमदार  गाडगीळ यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.

दरम्यान, आमदार गाडगीळ यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर  त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  अनंत गाडगीळ यांची विधानपरिषदेची मुदत पुढच्या वर्षी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे  गाडगीळ शिवसेनेत  प्रवेश करणार, अशी चर्चा  सुरू झाली होती. यावर गाडगीळ यांनी खुलासा केला आहे.