शिवसेनेत दम असेल तर, असदुद्दिन ओवेसींना मुंबईत आडवून दाखवावे

0
1504

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – शिवसेनेत दम असेल तर, एमआयएमचे अध्यक्ष व  खासदार असदुद्दिन ओवेसी यांना मुंबईत येण्यापासून आडवून दाखवावे, असे आव्हान डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी कोल्हापूरात बोलताना दिले.

वंचित बहुजन आघाडीची सभा २५ फेब्रुवारीला मुंबईत आहे. या सभेसाठी खासदार असदुद्दिन ओवेसी मुंबईत  येणार आहेत. शिवसेनेत दम असेलष तर त्यांनी ओवेसींना अडवून दाखवावे, असे आव्हान   सुकुमार कांबळे यांनी दिले आहे. कोल्हापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते  बोलत होते.

कोल्हापुरातील सभेला प्रकाश आंबेडकरांसमवेत असदुद्दिन ओवेसी उपस्थित राहणार होते.  या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही सभा उधळून लावण्याची धमकी दिली होती.  या धमकीला उत्तर देताना  कांबळे म्हणाले की, आम्ही लोक ओवेसींबरोबर आहोत. ओवेसींना रोखण्याची तुमची ताकद नाही. कोल्हापुरात ते आले नाहीत, मात्र मुंबईत येणार आहेत. त्यावेळी दम असेल, तर अडवून दाखवा.