Maharashtra

शिवसेनेविरोधात ५ ठिकाणी नारायण राणे आपले उमेदवार उभे करणार

By PCB Author

February 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युती झाली  आहे. तरीही भाजपचे खासदार नारायण राणे यांचा  महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील  पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहेत. हे पाचही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व अन्य एका मतदारसंघांत  राणे आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत.  आपला पक्ष स्वतंत्र आहे.  पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत, असे राणे यांनी  म्हटले आहे.  प्रत्येक महसूल विभागात एक उमेदवार उभा केला जाईल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळणा नाही.  ज्या काही जागा येतील त्या भाजपमुळे येतील, असेही राणे यांनी सांगितले.

भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली. तसेच आगामी निवडणुकीतील आपल्या भूमिकेविषयी राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.