शिवसेनेच्या राजकीय फायद्यासाठी ‘ठाकरे’ चित्रपट काढलेले नाही – संजय राऊत

0
758

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – गेल्या चार वर्षापासून ‘ठाकरे’  चित्रपटाच्या निर्मितीवर काम सुरू आहे.  त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय फायद्यासाठी हा चित्रपट काढलेले नाही. ज्यांना हा चित्रपट निवडणुकांच्या फायद्यासाठी काढला, असे वाटत असेल त्यांनी वर्षभर निवडणुका पुढे ढकलाव्या, असा टोला शिवसेने नेते व खासदार  संजय राऊत यांनी टीकाकारांना लगावला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,  बाळासाहेब हे काही अपघातानाने झालेले शिवसेनाप्रमुख नव्हते. ते कतृत्त्वाने शिवसेना प्रमुख झाले. अनेक नेते, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान देशात झाले, मात्र बाळासाहेबांसारखे  कोणीही होऊ शकलेले नाही, असे राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या दबावामुळे दोन चित्रपटांच्या निर्मात्यांनी  त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत, असाही आरोप होत आहे. या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की,   बाळासाहेब स्वत: एक ब्रँड आहे, कोणालाही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलायला आम्ही सांगितले नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, २५ जानेवारीला ‘ठाकरे’चित्रपट प्रदर्शित होणार आहे.