शिवसेनेचे सगळे नखरे माहीत आहेत, ते कुठेही जाणार नाहीत – मुख्यमंत्री

0
810

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आम्ही अहंकारी नाही आम्ही जमिनीला धरून असलेली माणसे आहोत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले. शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला माहीत आहेत. त्याचबरोबर शिवसेना  आमच्यासोबतच राहील ते कुठेही जाणार नाही, आमची साथ सोडणार नाही, असेही  फडणवीस म्हणाले.

दिल्लीतील एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांना पाच राज्यात भाजपला अहंकार नडला, असे शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी टीका केल्याकडे लक्ष वेधले. यावर फडणवीस यांनी उत्तर दिले. शिवसेनेचे नखरे जे तुम्हाला दिसतात तसे नाहीत. आम्हाला सगळे नखरे ठाऊक आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सामनातील अग्रलेख वाचले, तर वाटते की युती होणे अशक्य आहे का ?यावर मी सामना वाचत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना आणि भाजपा यांच्यातला कलगीतुरा कायमच रंगलेला असतो. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. असे असले तरीही आम्हाला त्यांचे सगळे नखरे ठाऊक आहेत, ते आमची साथ सोडणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.