Maharashtra

शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंतांच्या वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू  

By PCB Author

September 30, 2019

सोलापूर, दि. ३० (पीसीबी) – बार्शीजवळील शेलगाव होळे परिसरात शिवसेनेचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवार) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. 

श्याम होळे असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातानंतर शेलगावातील संतप्त जमावाने  गाडीची तोडफोड केली आहे. तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जमावाकडून करण्यात येत आहे. सावंत सध्या मुंबईमध्ये आहेत. गाडीमध्ये त्यांचे नातेवाईक होते.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात कोणाला समजू नये, म्हणून तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीची नंबर प्लेट काढून ठेवली. पोलिसांनी श्यामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.