Banner News

शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरे यांना अडकवितात – निलेश राणे यांचा गौप्यस्फोट

By PCB Author

August 21, 2020

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचं नावच घेतलं नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला.

शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

इशाऱ्यावर राजकारण केलं जाऊ शकत नाही, नाव सिद्ध करु शकत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे ती योग्य वेळी सीबीआयला हवी असेल, त्यांना गरज असेल, सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही टोकाला जाऊन मदत करण्यास आपण तयार आहोत. मागितल्यास माझ्याकडे असणारी माहिती देण्यास तयार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.