शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना ‘हिंदूत्व शौर्य पुरस्कार’ प्रदान

0
424

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – पुणे येथील शिवप्रतापगड  उत्सव समिती व समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून नातूबाग मैदान येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी औरंगाबाद येथील शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना हिंदूत्व शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिध्द लेखक व प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे व निवृत्त एअर चीफ मार्शल  भूषण गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

औरंगाबाद येथे मे २०१८ मध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये जीवाची पर्वा न करता राजेंद्र जंजाळ यांनी हिंदू कुटुंबाला दंगेखोर व धर्मांध मुस्लिमांच्या तावडीतून  सुटका केली होती. तसेच  त्यांना सुरक्षित स्थळी ठेवले होते.

या शौर्याबद्दल जंजाळ यांना हिंदूत्व शौर्य  पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. चांदीचे शिवकालीन कडे व स्मृतीचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.