Notifications

शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरेंच नाव चिठ्ठीत लिहून वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या

By PCB Author

April 12, 2019

उस्मानाबाद, दि. १२ (पीसीबी) – “उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले”, अशी सुसाईड नोट लिहून एका वृध्द शेतकऱ्यांनी शेतातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या सुसाईड नोटमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे देखील नाव आहे.