शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

0
545

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा  मतदारसंघातील  शिवसेनेचे विद्यमान आमदार  गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसात तक्रार  देण्यात आली आहे.  फेसबुकच्या अकाऊंटशी संलग्न असणारे मोबाईल क्रमांक, मेल आयडी हॅक झाले. त्यानंतर त्यांचे अकाऊंटच डिलीट झाले. 

याबाबत चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी सायबर क्राईममध्ये  माहिती दिली. ऐन निवडणुकीच्या काळातच फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने या मागचा सूत्रधार  त्वरीत  शोधून  काढावा,  अशी मागणी  जगताप यांनी केली आहे.

गौतम चाबुकस्वार  पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत अकाऊंट  हॅक झाल्याने चाबुकस्वार यांच्या कार्यकर्त्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.  चाबुकस्वार यांच्या फेसबुक अकाऊंटवर हजारो  मतदार जोडले आहेत.  या अकाऊंटच्या माध्यमातून ते त्यांच्या मतदारसंघातील कामे नागरिकांपर्यंत पोहचवत  होते.

अधिक तपास  पोलिसांनी सुरू केला आहे.