शिवसेनेची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जुन्यांच चेहऱ्यांना संधी   

0
610

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची  पहिली यादी (गुरूवारी) जाहीर झाली. त्यानंतर शिवसेनेनेही राज्यातील उमेदवारांची पहिली  यादी आज (शुक्रवार)  जाहीर केली आहे.  युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. शिवसेनेने आपल्या २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

शिवसेनेचे  उमेदवार

दक्षिण मुंबई -अरविंद सावंत

दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

उत्तर-पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर

ठाणे – राजन विचारे

कल्याण – श्रीकांत शिंदे

रायगड – अनंत गीते

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत

कोल्हापूर – संजय मंडलिक

हातकणंगले – धैर्यशिल माने

नाशिक – हेमंत गोडसे

शिर्डी – सदाशिव लोखंडे

शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील

औरंगाबाद – चंद्रकांत खैरे

यवतमाळ-वाशिम – भावना गवळी

बुलडाणा – प्रतापराव जाधव

रामटेक – कृपाल तुमाणे

अमरावती – आनंदराव अडसूळ

परभणी- संजय जाधव

मावळ – श्रीरंग बारणे

हिंगोली – हेमंत पाटील

उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर