Maharashtra

“शिवसेनेचा वाघ दरवाजातून म्हणतो १४४ जागा द्या…

By PCB Author

September 21, 2019

गुहागर , दि.२१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुहागरमध्ये सध्याच्या भाजप शिवसेनेच्या युतीवरच्या चर्चेच्या गुऱ्हाळावर जोरदार टीका केली आहे.

युतीच्या पोपटाची अवस्था फार वाईट आहे. वाघ दरवाजातून १४४ जागांची मागणी करतोय, तर भाजप सांगतोय आम्ही फेकलाय तेवढा तुकडा घ्या, अशा शब्दात कोल्हेंनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

स्वार्थासाठी सत्तेच्या वळचणीला जाणाऱ्यांचा इतिहास नसतो, तर लढणाऱ्यांचा असतो, अशा शब्दात कोल्हेंनी गयारामांवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजींचा भगवा आता राष्ट्रवादीच्या हातात आला आहे. कुणाच्या जाण्याने पोकळी निर्माण होणार नाही. कारण झाडाला सुद्धा पालवी फुटते, अशा भावना कोल्हेंनी यावेळी व्यक्त केल्या.