मुंबई,दि.२७(पीसीबी) – उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत या पार्श्वभूमीवर “मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. मुंख्यमंत्री शिवसेनेचाच म्हटल्यावर माझ्यावर हसायचे, आज मी हसतोय”, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. जनता स्वागत करत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय देशाच्या हिताचा आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मी चाणक्य वगैरे नाही मी योद्धा आहे, जीवनात परिणामांची चिंता मी केली नाही, साहेबांनी मला नेहमी आशीर्वाद दिलेत, असं संजय राऊतांनी म्हटलंय.
आजपासून माझी जबाबदारी कमी झाली. महाराष्ट्रात नवं सरकार येत आहे. मुंख्यमंत्री नवे येत आहेत. ते काम करतील. देशाच्या परिवर्तनाची ही सुरूवात आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.