Maharashtra

शिवसेना ५ ते १० विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार

By PCB Author

September 17, 2019

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या ६३ आमदारांपैकी ५ ते १० आमदारांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी शिवसेनेने दुसरे उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. पण बंडखोरी होण्याच्या शक्यतेने या आमदारांची नांवे उघड केलेली नाहीत.

आमदार गेल्या पाच वर्षात ‘मातोश्री’साठी नॉटरिचेबल राहिले आहेत, लोकसभेच्या निवडणुकीत कमी पडले आहेत, ज्यांच्याविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत, जनतेची कामे केली नाहीत, अशा ५ ते १० जणांना डच्चू देण्याचा विचार शिवसेनने केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोअर कमिटीने  या आमदारांची यादी तयारी केली  आहे. तसेच इतर विद्यमान आमदारांना मात्र हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सोडून इतर कोणत्या नव्या उमेदवारांना संधी मिळणार ?  याकडे लक्ष  असेल.  तर तिकीट जाण्याच्या भितीने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.