Maharashtra

शिवसेना लपून-छपून कारभार करत नाही, जे करते ते उजळ माथ्याने सर्वांच्या साक्षीने – एकनाथ शिंदे

By PCB Author

November 29, 2019

मुंबई,दि.२९(पीसीबी) – शिवसेना लपून-छपून कारभार करत नाही, जे करते ते उजळ माथ्याने सर्वांच्या साक्षीने करते, असं म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी?, असं म्हणत फडणवीसांनी टीका केली होती.

यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. शिवसेना काहीही लपून-छपून करत नाही. जे करायचं आहे ते उजळ माध्याने करते, असं म्हणत शिंदे यांनी टीका केली आहे.