Notifications

शिवसेना मुंडावळ्या लावून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही – संजय राऊत

By PCB Author

January 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – आम्ही स्वबळाची घोषणा केली आहे, शिवसेना प्रस्ताव घ्यायला बसलेली नाही, शिवसेनेशी जवळीक साधावे, असे सर्वांना हल्ली वाटत आहे. मात्र, शिवसेना येथे मुंडावळ्या लावून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही. आमचे मॅरेज ब्युरो नाही, प्रपोजल येतायत. शिवसेना, शिवसेना आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या प्रस्तावाला प्रत्युत्तर  दिले आहे.