‘शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर’ – अनंतराव गुढे

0
510

मुंबई, दि, १५ (पीसीबी) – अमरावतीमधील शिवसेना नेते अनंत गुढे आणि युवा नेते अभिजीत अडसूळ यांच्यात कलगीतुरा रंगला होता. शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेकडे अभिजीत अडसूळ यांनी ही तक्रार केली आहे. नवनीत कौर राणा यांचा विजय आणि आभार रॅलीमधील माजी खासदार अनंतराव गुढे यांचा पत्नीने खासदार नवनीत राणांचा सत्कार केला होता, तसेच शुभेच्छाही दिल्या होत्या. या सगळ्याचे व्हिडिओ आणि फोटो मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले आहेत.

या पार्श्वभुमीवर अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडल्याचे ते म्हणाले. शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो असे गुढे म्हणाले. माझ्या हकालपट्टीच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले.