शिवसेना- भाजप युती म्हणजे पाडापाडीची सुरूवात – प्रकाश आंबेडकर

0
618

अकोला, दि. २० (पीसीबी) –  भाजप-शिवसेनेच्या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. युती म्हणजे ही पाडापाडीची सुरूवात असून याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

अकोल्यामध्ये  पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री या दृष्टिकोनातून आपल्या जागा वाढवणे व त्यांच्या कमी करणे, असे प्रकार होणार आहेत. मतदारांवर विशिष्ट शिक्का मारता येत नाही.

भाजप-शिवसेनेची युतीही पाडापाडीसाठीच झाली आहे. वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत सहभागी होण्याबाबतचा निर्णय अद्यापही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही,  असे सांगून २३ फेब्रुवारी रोजी बोलू’, असे सांगून या विषयाला बगल दिली.