शिवसेना-भाजपातील महाभारतासाठी ‘दिग्गज रणनीतीकार’ जबाबदार ?

0
680

शिवसेना-भाजपातील महाभारतासाठी ‘दिग्गज रणनीतीकार’ जबाबदार ?

मुंबई, दि.१३ (पीसीबी)- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्ता मिळवून देण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या दिग्गज रणनीतीकारामुळेच महाराष्ट्रात भाजपा सत्तास्थापनेपासून दूर राहिल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या महाभारतासाठी भाजपाकडून निवडणूक रणनीतीकार आणि जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी भाजपाच्या सोशल मीडियाच्या राष्ट्रीय प्रभारी प्रिती गांधी यांनी प्रशांत किशोर यांना जबाबदार ठरवले आहे.

“प्रशांत किशोर यांनी डुबवलं”, असं ट्विट प्रिती गांधी यांनी केले आहे. तर, जदयूचे बंडखोर नेते अजय आलोक यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी किशोर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’मुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झालीये असे म्हटले आहे. “काही दिवसांपासून शिवसेना एका रणनीतीकाराकडून ज्ञान घेत होती. परिणाम सगळ्यांसमोर आहे..”अशा आशयाचं ट्विट अलोक यांनी केले आहे.