शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री? अजित पवार उपमुख्यमंत्री?

0
719

महाराष्ट्र,दि. ११ (पीसीबी)-शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याने शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी सत्ता स्थापन केल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेनं भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला असून सेना आमदारांची आज बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय शिवसेना घेऊ शकते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद देण्याचंही या बैठकीत ठरल्याचं बोललं जातं आहे. 

शिवसेनेकडे ५६ जागा आहेत तर आघाडीकडे ९८ जागा आहेत. त्यामुळे शिवसेनेनं आघाडीला सोबत घेतल्यास मॅजिक फिगर गाठता येते.