Maharashtra

शिवसेना नंतर राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस, कोण आहे हा नेता

By PCB Author

January 27, 2021

सोलापूर, दि. २७ (पीसीबी) – दिवंगत माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या म्हणजेच 28 जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षांतरामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणालाच वेगळे वळण मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे.  मुंबई काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धवलसिंह प्रवेश करणार आहेत. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात रंगत येणार आहे. पाटलांनी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून महत्त्वांच्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. दरम्यान, धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्तेही पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी आशाही काँग्रेसला आहे.