शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचारसभेत चाकूने हल्ला

0
707

उस्मानाबाद , दि. १६ (पीसीबी) – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचार सभेत एका तरुणाने चाकू हल्ला  केला. या हल्ल्यात निंबाळकर किरकोळ जखमी झाले आहेत.  कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे ही घटना घडली.अजिंक्य टेकाळे  असे हल्ला करणाऱ्या तरूणाचे नांव असून तो पाडोळी गावचा रहिवासी आहे.  हल्ला करुन अजिंक्य घटनास्थळावरुन पसार झाला आहे.  पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नायगाव पाडोळी येथील प्रचार सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्याभोवती   गर्दी केली होती. या गर्दीतूनच हल्लोखोर अजिंक्य टेकाळे पुढे आला आणि त्याने निंबाळकर यांना हात मिळवत त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला निंबाळकर यांच्या डाव्या हातावरील घड्याळावर बसला. त्यामुळे सुदैवाने निंबाळकर गंभीर जखमी झाले नाहीत.

या हल्ल्यानंतर ओमराजे निंबाळकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून काही जण माझ्या प्रचार सभेत विनाकारण गोंधळ घालत होते. मला टार्गेट केले जात आहे. या तरुणाने हल्ला का केला, याची मला माहिती नाही. जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे, अशी प्रतिक्रिया निंबाळकर यांनी दिली.