Banner News

शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिलभय्या राठोड यांचे निधन

By PCB Author

August 05, 2020

अहमदनगर,दि.५(पीसीबी) – शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री अनिलभय्या राठोड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे निधन झाले. अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात बुधवारी पहाटे ५.३० च्या वाजता उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राठोड यांचे निधन झाले.

अनिल राठोड हे सलग पाच वेळा नगर शहर मतदारसंघाचे आमदार व युती सरकार मध्ये मंत्री देखील होते. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. अहमदनगर जिल्ह्यातील बलाढ्य शिक्षण सम्राट आणि सहकार सम्राटांच्या विरोधात शिवसेना वाढविण्यात अनिल राठोड यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदनगर शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे.