Maharashtra

शिवसेना आमदार तानाजी सावंत, राजू शेट्टी यांच्यात जोरदार खडाजंगी

By PCB Author

November 12, 2018

पुणे, दि. १२ (पीसीबी) – ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार  राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यामध्ये फोनवरुन जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. ऊसाला एफआरपी देण्याच्या मागणीवरुन ही बाचाबाची झाल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यातील साखर संकुलात राजू शेट्टी आणि साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्यात बैठक सुरु होती. या बैठकीत एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. साखर आयुक्तांनी एफआरपी थकवलेल्या कारखान्यांच्या चेअरमनशी खासदार राजू शेट्टींचे फोनवरुन बोलणे करुन देण्यास सुरुवात केली.

त्यावेळी एक फोन उस्मानाबादच्या भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन तानाजी सावंत यांना लावण्यात आला. यावेळी तानाजी सावंत आणि राजू शेट्टी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तानाजी सावंत हे सध्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत.